Monday , February 6 2023

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून पनवेलमध्ये ड्रेनेजच्या कामाची पाहणी

पनवेल : वार्ताहर

नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल परिसरातील काही ठिकाणी ड्रेनेजची समस्या निर्माण झाली होती. याबाबत तत्काळ नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाहणी करून त्याठिकाणी समस्यांचे निराकरण केले आहे. शहरातील तालुका पोलीस स्टेशन ते चिंतामणी कार्यालय चौक या रस्त्यावर स्ट्रॉम वॉटर ड्रेनचे काम सुरू आहे, डंपरच्या रहदारीमुळे दोन ठिकाणी ड्रेनेजचे झाकण तुटल्यामुळे रहदारीस त्रास होत होता. तसेच ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा  येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. त्यात दोन दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते आणि त्यामुळे त्रासात आणखीनच भर पडली. कोणतीही अनुचित दुर्घटना होऊ नये यासाठी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तातडीने कॉन्ट्रॅक्टर बोलवून घेतले आणि त्वरित झाकणे बदलून घ्यायला सांगितले. काम व्यवस्थित झाले आहे की नाही हे स्वतः जातीने उपस्थित राहून शहानिशा केली. या वेळी भेट झालेल्या ज्येष्ठ नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभागातील समस्या जातीने लक्ष देऊन सोडवतात त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply