लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि माणदेशी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विनामूल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. याचे ऑनलाइन उद्घाटन नुकतेच भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, भाजल जिल्हा चिटणीस अविनाश कोळी यांनी मार्गदर्शन केले.
माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यात केक बनविणे, ड्राय मसाला, कम्प्युटर क्लास, शिलाई मशीन रिपेअर, सरबत, प्रिमिक्स, वारली पेंटिग, सॅनिटायझर, हॅण्डवॉश बनविणे असे प्रशिक्षण दिले जाते आहे.
या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त महिलांचा लाभ व्हावा यासाठी पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती मोनिका महानवर, भाजप उत्तर रायगड सरचिटणीस मृणाल खेडकर, कर्जत येथील नगरसेविका विनिता घुमरे, स्वामिनी मांजरे, पनवेलच्या माजी नगरसेविका नीता माळी, सुहासिनी केकाणे, मानदेश संस्थेच्या को-ऑर्डिनेटर रूपाली लांडगे, सर्व मंडळ अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका चारुशीला घरत यांनी आणि सूत्रसंचालन भाजप महिला मोर्चा उत्तर रायगडच्या अॅड. संध्या शारबिंद्रे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नगरसेविका विनिता घुमरे यांनी मानले.