Breaking News

पनवेल मनपाच्या कोळीवाड्यातील शाळेत हॅपीनेस किटचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

अक्षयपात्र फाऊंडेशन ही संस्था देशात सरकारी आणि काही खासगी शाळांना मध्यान्ह भोजन पुरविते. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या कोळीवाडा येथील शाळेत रविवारी (दि. 13)हॅपीनेस किटचे वाटप करण्यात आले. संस्थेकडून शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना हॅपीनेस किटचे वाटप नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या हॅपीनेस किटमध्ये जीवनावश्यक धान्य, कडधान्य यांचा समावेश आहे. वाटपानंतर शाळेकडून मान्यवरांचे व संस्थेचे आभार मानण्यात आले. या वेळी नगरसेवक मुकीद काझी, हरिश्चंद्र भगत, प्रमोद पाटील, बाळा भोईर, शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम आदी उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply