Breaking News

पनवेल महापालिकेच्या कर्मचार्‍यांची दिवाळी होणार गोड; सानुग्रह मंजूर

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी,  पूर्वाश्रमीच्या समाविष्ट 23 ग्रामपंचायतींमधील समावेशन प्रलंबित असलेल्या 32 कर्मचार्‍यांसह  कंत्राटी तत्त्वावर ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार आहे. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 7) झालेल्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेत कर्मचार्‍यांना दिपावलीसाठी सन 2021-22 सानुग्रहाचा विषय मंजूर करण्यात आला. पनवेल महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचार्‍यांना तसेच पूर्वाश्रमीच्या समाविष्ट 23 ग्रामपंचायतींमधील समावेशन प्रलंबित असलेले 32 कर्मचारी यांना 25 हजार सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. कंत्राटी तत्त्वावर ठोक मानधनावर कार्यरत असलेले अधिकारी-कर्मचारी, परिश्रमिक कर्मचारी, राष्ट्रीय नागरी आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी, आशा वर्कर्स-गट प्रवर्तक तसेच शिक्षण विभागातील शिक्षक यांना पाच हजार  प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आला आहे. 240 व त्याहून अधिक दिवस काम केलेल्या एकूण 901 पात्र कर्मचार्‍यांना महापालिकेने प्रस्तावित केलेले  सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply