Breaking News

एसटी महामंडळाचे सेवा निवृत्तांकडे दुर्लक्ष

पनवेल : प्रतिनिधी

शासनाकडून करोडो रुपये घेऊन ठेकेदारांच्या घशात टाकणार्‍या एसटी महामंडळाने आपल्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना दोन वर्षे झाली तरी त्यांचे हक्काचे पैसे न दिल्याने त्यांच्यावर कोरोनाकाळात उपासमारीची पाळी आली आहे.  आपलेच पैसे आपल्या आजाराला न मिळाल्याने सुमारे 50 कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. महाविकास आघाडी सरकार हे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नसल्याचे यावरून दिसत असल्याचे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी म्हटले आहे. एसटी महामंडळाचा कारभार शिवसेनेच्या मंत्र्यांकडे आल्यापासून एसटीत ठेकादारी पध्दत आली. एसटीच्या गाड्या आगारात उभ्या करून गाड्या भाड्याने घेतल्या जातात, कमी खर्चात होणार्‍या सफाईचा ठेका तिप्पट दरात व तिकीट मशीनमधून दिल्या जाणार्‍या प्रत्येक तिकीटामागे ठेकेदारला पैसे पण बिघडल्यास मात्र वसूली वाहकाकडून करणार असा छत्रपतींचे नाव घेऊन मुघलाई कारभार  सुरू आहे. त्यामुळे ठेकेदारचे खिसे भरले जात आहेत. सेवा निवृत्त कर्मचार्‍यांना आपलेच पैसे आपल्या आजाराला न मिळाल्याने  सुमारे 50 रा.प. कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामूळे हे आमचे दुर्दैव आहे असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. एकतर पगार बंद तसेच त्यांना सेवानिवृत्तीनंतर त्या पैशाचा लाभ घेता आला नाही. सेवानिवृत्तीनंतर ताबडतोब पेन्शन सुरू झाली पाहिजे हा सरकारचा कायदा आहे, मात्र पेन्शन तर दूरच त्याच्या फाईल सुध्दा पेन्शन कार्यालयात पाठविल्या नाहीत. त्यामुळे चार वर्षांपासुन कोणत्याही कर्मचार्‍यांना पेन्शन सुरू झाली नाही. महाविकास आघाडी सरकार हे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहे का असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. 

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply