Breaking News

’ज्योतीने तेजाची आरती’; गदिमा आणि बाबूजींना सांगीतिक मानवंदना

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑगस्टला कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या अजरामर कार्याला मानवंदना असलेल्या ज्योतीने तेजाची आरती या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजता पनवेलमध्ये करण्यात आले आहे.
भाजप रायगड जिल्हा सांस्कृतिक सेलच्या वतीने आयोजित भावगीते, भक्तिगीते आणि चित्रपट गीतांचा हा बहारदार कार्यक्रम पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार असून प्रवेश विनामूल्य असणार आहे. या कार्यक्रमाचे निर्माता विवेक भागवत, गायक मंदार आपटे, धनश्री देशपांडे, नचिकेत देसाई, प्रीती निमकर आणि निवेदक म्हणून अनघा मोडक असणार आहेत.
मोफत प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह असून अधिक माहितीसाठी अभिषेक पटवर्धन (8668332159), गणेश जगताप (9870116964), वैभव बुवा (9029410699) किंवा आदित्य उपाध्ये (8291197526) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Check Also

भारतमाता चित्रपटगृहाशी माझं नातं अगदी वेगळं…

भारतमाता चित्रपटगृहाने छान कात टाकली. ते आजचं झाले.बदल हा होतच असतो, तो व्हायलाही हवा. काही …

Leave a Reply