पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने अल्पसंख्याक समुदायामध्ये धान्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14मधील अल्पसंख्याक समुदायामध्ये जवळपास 1150 धान्याचे किट वितरीत करण्यात आले. याबद्दल नगरसेवक अब्दुल मुकिद काझी आणि भाजप अल्पसंख्यक सेल युवा मोर्चा रायगडचे जिल्हाध्यक्ष जवाद मुकिद काझी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे समुदायाच्या वतीने आभार मानले आहेत.