नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. बायो बबलमध्ये भारतीय खेळाडूंचा कसून सराव सुरू आहे. अशातच कर्णधार विराट कोहलीच्या शतकाकडेही क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. अंतिम सामन्यात विजयासह कर्णधार विराटकडे विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी करताच कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाणार आहे.
आता हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग आणि विराट कोहली यांच्या नावावर बरोबरीने आहे. विराट आणि पाँटिंग या दोघांच्या नावावर 41 शतके आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने एकूण 100 शतके झळकावलीत. 71 शतकांसह रिकी पाँटिंग या क्रमवारीत दुसर्या स्थानावर आहे, तर विराटची एकूण 70 शतके आहेत.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …