म्युनिक ः वृत्तसंस्था
अत्यंत भरात असलेल्या विश्वकप विजेत्या फ्रान्सच्या संघाने कडवा प्रतिस्पर्धी असलेल्या जर्मनीचा युरो कप 2020मध्ये 1-0 असा पराभव केला आहे. याआधी 2016मध्ये फ्रान्सने युरो कपमध्ये जर्मनीला धूळ चारली होती. त्या पराभवाचे उट्टे फेडण्याची संधी जर्मनीने गमावली असून फ्रान्सनेच जर्मनीला 1-0 असे पराभूत केले. जर्मनीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु फ्रान्सचा बचाव जर्मनीला भेदता आला नाही.
संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागलेला फ्रान्स विरुद्ध जर्मनी युरो कपमधील साखळी सामना सुरू झाल्यानंतर 20व्या मिनिटाला जर्मनीच्या मँट हमेल्सने सेल्फ गोल केला आणि फ्रान्सला 1-0 अशी आघाडी मिळाली. फ्रान्सचे आक्रमण रोखण्याचा प्रयत्न करताना हमेल्सने मारलेल्या चेंडूवर जर्मनीवरच गोल झाला व फ्रान्सचे पारडे जड झाले.
विश्वकप व युरो कप दोन्ही चषक दोन वेळा जिंकण्याचा पराक्रम केलेला फ्रान्स आणखी एकदा युरो कपवर नाव कोरण्यासाठी उत्सुक आहे, तर रशियामधल्या विश्व कप स्पर्धेत साखळी सामन्यातच गारद झालेली जर्मनी युरो कपमध्ये पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करण्यास आतुर आहे.
फ्रान्सने दोन वेळा यूरो कप जिंकला आहे. 1984 आणि 200मध्ये फ्रान्सने विजेतेपद जिंकले होते, तर जर्मनीने तीन वेळा यूरो कप जिंकला आहे. 1972, 1980 आणि 1996मध्ये त्यांनी जेतेपद पटकाविले आहे.
Check Also
दिल चाहता है @२५ वर्षे; कायमच तारुण्यात राहिलेला चित्रपट…
एखादी मुव्हीज कायमच तारुण्यात राहण्याची कारणे काय असतात? आजची जेन झी आणि जेन अल्फा पिढी …
RamPrahar – The Panvel Daily Paper