मुंबई : अयोध्येतील राम मंदिर उभारणीमधील कामात जमीन खरेदी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून शिवसेनेने घेतलेल्या जहाल भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाकडून बुधवारी (दि. 16) आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना भवन परिसरात तुफान हाणामारी झाली. यानंतर माहीम पोलीस ठाण्यात पोहचल्यावर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देताना, या आंदोलनानंतर आंदोलक अटक होऊन गेल्यावर लपूनछपून, पोलिसांच्या आड राहून एका महिलेवर हल्ला करणे यातून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवलेली आहे. ज्या वेळी सोनिया गांधी, रॉबर्ट वढेरा देव बनतात, त्या वेळी तेंडुलकर, साठे, आंबेडकर शिवसेनेचे दुष्मन होतात. हे आज येथे दिसले. त्यामुळे या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत शिवसेनेवर घणाघात केला.
Check Also
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …