Breaking News

स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर

विनायक पात्रूडकर आणि माधव पाटील सत्कारमूर्ती; उद्या होणार सन्मान

 

कर्जत : बातमीदार

स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दैनिक लोकमतचे विनायक पात्रूडकर यांना तर जिल्हास्तरीय ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार माधव पाटील (पनवेल) यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी (दि. 27) नेरळ येथे मान्यवरांचे उपस्थितीत होणार असल्याची माहिती कर्जत प्रेस क्लबने  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. माथेरान येथील पत्रकार आणि राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य संतोष पवार यांचे 9 सप्टेम्बर 2020 रोजी निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कर्जत प्रेस क्लब तर्फे दरवर्षी स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी निवड समितीने राज्यस्तरीय संपादक पुरस्कारासाठी विनायक पात्रूडकर यांची निवड केली आहे. 11 हजार रुपयांचा धनादेश, समानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर रायगड जिल्हास्तरीय ज्येष्ठ पत्रकार पुरस्कारासाठी माधव पाटील यांची निवड झाली आहे. 5500 रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नेरळ येथील जेनी ट्युलिप सिबीएससी स्कुलच्या प्रांगणात बुधवारी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून, पालकमंत्री आणि माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार सुरेश लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply