Breaking News

युरो कप : इटलीची बाद फेरीत धडक

रोम ः वृत्तसंस्था

युरो कप स्पर्धेच्या ‘अ’ गटातील चौथ्या सामन्यात इटलीने स्वित्झर्लंडला 3-0ने मात दिली. सलग दोन विजयांसह इटलीने बाद फेरीत धडक मारली आहे. इटलीचा मिलफिल्डर मॅन्युअल लोकेटेली याने 26व्या आणि 52व्या मिनिटाला दोन गोल केले. या गोलसाठी डॉमेनिका बेरार्डी याने पास दिला होता. लोकेटेलीने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल केले आहेत. त्यानंतर 89व्या मिनिटाला सीरो इम्मोबायलने तिसरा गोल करीत स्वित्झर्लंडवर 3-0ने विजयी आघाडी मिळवली. पहिल्या सत्रातही इटलीचे पारडे जड असल्याचे दिसून आले. 19व्या मिनिटाला इटलीचा कर्णधार जॉर्जिया कॅलिनी याने गोल करीत इटलीला आघाडी मिळवून दिली होती, मात्र हँडबॉलचे कारण देत तो गोल अमान्य करण्यात आला. या सत्रात फुटबॉल जास्तीत जास्त वेळ ताब्यात ठेवण्यात इटलीच्या खेळाडूंना यश आले. त्यामुळे स्वित्झर्लंडच्या खेळाडूंची चांगलीच दमछाक झाली. इटलीने 295 वेळा फुटबॉल पास केला. या सामन्यात इटलीने चार आणि स्वित्झर्लंड संघाने सहा फॉऊल केले. इटली आणि स्वित्झर्लंड या स्पर्धेतील प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. इटलीने पहिल्या सामन्यात टर्कीला 3-0ने पराभूत केले होते. त्यामुळे या सामन्यातील विजयानंतर इटलीचे बाद फेरीतील स्थान निश्चित झाले आहे, तर स्वित्झर्लंडचा वेल्ससोबतचा पहिला सामना 1-1ने बरोबरीत सुटला होता. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान खडतर झाले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply