Breaking News

कसोटी क्रमवारीत कोहली चौथ्या स्थानी

दुबई ः वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जाहीर झालेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानी मुसंडी मारली आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने पुन्हा अग्रस्थान गाठण्याची किमया साधली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडचा कर्णधार जो रूटला चांगली फलंदाजी करता आलेली नव्हती. त्यामुळे त्याच्या कसोटी क्रमवारीतील स्थानात घसरण झाली असून याचा फायदा आता कोहलीला मिळाला आहे. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार रूटसाठी हा एक मोठा धक्का असेल. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनलाही धक्का बसला आहे. कारण केन हा क्रमवारीत अव्वल स्थानावर होता, पण इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात तो खेळला नाही. त्यामुळे त्याला अव्वल स्थान गमवावे लागले आहे. विल्यम्सनचे अग्रस्थान स्मिथने काबीज केले. दरम्यान, फलंदाजांच्या क्रमवारीतील अव्वल 10 जणांमध्ये भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (747 गुण) आणि सलामीवीर रोहित शर्मा (747 गुण) संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहेत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply