अलिबाग ः वार्ताहर
राज्य उत्पादन शुल्क पनवेल यांनी काल उरण नाका परिसर येथे यश हॉस्पिटलसमोर बनावट स्कॉचच्या वाहतुकीवर पाळत ठेवली असता गोखले शाळेजवळील खोलीत छापा मारला असता बनावट स्कॉचचा 44 लिटरचा साठा आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. यात विविध ब्रँडच्या एक लिटर क्षमतेच्या एकूण 44 बाटल्या होत्या. स्कॉच बनविण्यासाठी लागणारे दोन फनेल, दोन मग, एक टोचा व विविध ब्रँडच्या बनावट बाटल्या बनवण्यासाठी वापरली जाणारी झाकणे, चार मोबाइल असा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासंदर्भात गुन्हा दाखल झाला असून दोनपैकी एक आरोपी फरार आहे. या कारवाईत दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परिसरातील प्रत्येक संशयास्पद हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.