Breaking News

बारावी सीबीएसई, आयसीएसईच्या परीक्षाही रद्द

नवी दिल्ली : देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाविरुद्ध देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. जर आयआयटी-जेईई किंवा अन्य काही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा का होऊ शकत नाहीत, असा प्रश्न याचिकाकर्त्याने उपस्थित केला होता, मात्र ही याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा आणि सीबीएसई-आयसीएसई बोर्डाचा निर्णय योग्यच असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठीच्या पद्धतील आव्हान देणारी याचिकादेखील न्यायालयाने या वेळी फेटाळून लावली.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply