Tuesday , February 7 2023

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव

खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी (दि. 3) उत्साहात झाला. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, मालाडच्या घनश्यामदास सराफ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत अपटे, विर्लेपार्ले येथील एन. एम. कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्सचे प्राचार्य डॉ. पराग अजगावकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य दीपक शिंदे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे, रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे, उपप्राचार्य शरदकुमार शाह, कल्चरल कमिटीच्या चेअरमन प्रा. नमिता अखौरी आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply