Breaking News

नवी मुंबईतील सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू होणार -आमदार मंदा म्हात्रे; नगरविकास खात्याने दर्शविला हिरवा कंदील

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील घरांचे थांबविण्यात आलेले सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात यावे, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. नगरविकास खात्यानेही या बाबत हिरवा कंदील दिला असून लवकरच सिटी सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून संकेत दिले असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले. नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील घरांचे सिटी सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबाबतचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असून या सिटी सर्वेक्षणास शिदोरे अ‍ॅण्ड शिदोरे कंपनीमार्फत बेलापूर गावातून सुरुवात करण्यात आली होती. अर्धेअधिक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर काही कारणास्तव हे सर्वेक्षण बंद करण्यात आले. त्यानंतर पुन्हा मे. टेक्कोम अर्बन मॅनेजमेंट कन्सल्टंस अ‍ॅण्ड सर्व्हिस प्रोवायडर्स या एजन्सीमार्फत 7 मार्च 2020पासून दिवाळे, सारसोळे व सानपाडा या गावठाण क्षेत्रातून सिटी सर्वेक्षण सुरू करण्याचे जिल्हाधिकारी ठाणे यांनी आदेश देऊनही त्यास सुरुवात करण्यात आलेली नव्हती. या बाबत पाठपुरावा केला असता कोरोना लॉकडाऊनमुळे सिटी सर्वेक्षणास सुरुवात होऊ शकली नव्हती, परंतु सद्यस्थितीत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली असताना शासनाचे सर्व नियम पाळून सिटी सर्वेक्षण सुरू करण्यास हरकत नसल्याने पुढील कार्यवाही करता येईल, तसेच याबाबत ग्रामस्थांमध्येही संभ्रम निर्माण होत असून या सिटी सर्वेक्षणास पुन्हा सुरुवात करून त्यांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड दिल्यास खर्‍या अर्थाने त्यांना न्याय मिळेल. त्यामुळे नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील थांबविण्यात आलेले सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली होती.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply