विश्वचषक नेमबाजी स्पर्धा
ओसिजेक (क्रोएशिया) ः वृत्तसंस्था
राही सरनोबत, मनू भाकर आणि यशस्विनी सिंग देस्वाल या भारतीय त्रिकुटाने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील सांघिक गटात कांस्यपदक पटकावले.
कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय संघाने हंगेरीच्या संघाला (व्हेरोनिका मेजर, मिरआम जॅको आणि सारा राहेल फॅबियान) 16-12 असे पराभूत केले. पात्रता स्पर्धेत भारतीय त्रिकुटाने 573 गुणांची कमाई केली.
पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर, दीपक कुमार आणि दिव्यांश सिंग पनवार या त्रिकुटाने कांस्यपदकाची लढत गमावली. सर्बियाने त्यांना 16-14 असे पराभूत केले. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक गटात भारताच्या अंजुम मुदगिल, अपूर्वी चंडेला आणि ईलाव्हेनिल व्हालारिव्हान या त्रिकुटाला 11वे स्थान मिळाले. पात्रता फेरीत त्यांना 1667.7 गुण मिळाले होते.