
पनवेल : ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (टीआयपीएल)च्या वतीने कळंबोली पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी रेनकोटचे वाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील आदी उपस्थित होते.