पाणदिवे : प्रतिनिधी
जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून उलवे येथील समाजसेवक किरण एकनाथ मढवी यांनी रविवारी (दि. 14) सकाळी पनवेल येथील श्री. साई ब्लड बँकेत जाऊन रक्तदान केले. त्यांना रक्तदात्याचे प्रमाणपत्र डॉ. अबू बक्र, रायगड भूषण मनोज पाटील, आणि सामाजिक कार्यकर्ते सुनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच मढवी यांनी उलवेनोड परिसरात एक सुसज्ज अशी रक्तपेढी व्हावी म्हणुन आमदार महेश बालदी यांना मागणी पत्र दिले. या वेळी मढवी यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल आमदार महेश बालदी यांनी कौतुक करुन उलवेनोड परिसरात रक्तपेढीची मागणी लवकरात लवकर पुर्ण होईल, असे सांगितले.