पनवेल ः प्रतिनिधी
येथील महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी (दि. 30) पदभार स्वीकारला. याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी बोलताना देशमुख यांनी पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा एकदा रूजू झाल्याने आनंद होत असून जे प्रकल्प सुरू आहेत ते प्राधान्याने पुढे घेऊन जाण्यावर भर देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या वेळी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रवीण पाटील, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, वंदना गुळवे, धैर्यशील जाधव, मुख्य लेखा परीक्षक विठ्ठल सुडे, मनोजकुमार शेट्टे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी आदी उपस्थित होते.
आयुक्त सुधाकर देशमुख यांची भिवंडी-निजापूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्याने पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा एकदा गणेश देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी पनवेलच्या आयुक्तपदी कार्यरत असताना गणेश देशमुख यांनी अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावून नवीन प्रकल्पांना चालना दिली होती. मागील वर्षी कोरोना काळातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. उत्तम प्रशासक म्हणून ते ओळखले जातात.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …