Breaking News

आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेत

पनवेल : रामप्रहर वृत्त

आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल ट्रस्ट आणि शंकरा आय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल हे नवीन पनवेल येथे नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. शंकरा आय फाऊंडेशन हे श्री कांची कामकोटी मेडिकल ट्रस्टचा एक भाग असून नेत्रचिकित्सेमध्ये गेल्या 44 वर्षांपासून निरंतर सेवेचे काम करीत आहे. तर आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल हे जागतिक दर्जाची नेत्रचिकित्सा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित आहे.

नुकतेच हे हॉस्पिटल राकेश झुनझुनवाला आणि कुटुंबीय तसेच पद्मश्री डॉ. आर. व्ही. रमाणी यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आदी उपस्थित होते. हे हॉस्पिटल सर्व सुविधांसह आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून याचे औपचारिक उद्घाटन या वर्षाच्या उत्तरार्धात एका विशेष समारंभाद्वारे करण्यात येणार आहे.

नवीन पनवेल शहराच्या मध्यभागी सेक्टर 05 मध्ये स्थापित केलेले हे सेवा केंद्र 81 हजार 364  चौरस फुट जागेत विस्तारलेेले असून यामध्ये एकाच छताखाली अत्याधुनिक व सर्व प्रकारच्या नेत्रसेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, तसेच या सेवा केंद्रात दरवर्षी 15 हजार नेत्र शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल येथे सर्व प्रकारच्या सुविधा सुरु करण्यासाठी कर्मचार्‍यांची पहिली बॅच सज्ज झाली  आहे. या केंद्रासाठी आवश्यक असलेल्या या बॅचमधील सर्व कर्मचार्यांना गेल्या दोन वर्षांपासून कोईम्बतूर येथील शंकरा आय फाऊंडेशनच्या केंद्रात प्रशिक्षण दिले आहे.

शंकरा आय फाऊंडेशन इंडिया यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी अशा वंदे मातरम या नेत्र आरोग्यसेवा कार्यक्रमाचे लक्ष्य भारतातील प्रत्येक राज्यात नेत्रसेवा पोहचविणे हे आहे. आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल हे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचून जागतिक दर्जाच्या नेत्रसेवा किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असून पनवेल येथे उभारण्यात आलेले हे हॉस्पिटल संस्थेचे 12 वे केंद्र आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply