Friday , September 29 2023
Breaking News

जोकोव्हिचची विजयी घोडदौड

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा

बिम्बल्डन ः वृत्तसंस्था
सर्बियाच्या गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनला 6-3, 6-3, 6-3 असे नमवून विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली आहे. याचबरोबर जपानच्या केई निशिकोरीने 100व्या ग्रँडस्लॅम विजयाची नोंद करताना अ‍ॅलेक्सी पॉपीरिनचा 6-4, 6-4, 6-4 असा पराभव केला.
अलिझे कोर्नेटने दोन आठवड्यांत दुसर्‍यांदा बियांका आंद्रेस्क्यूला पराभवाचा धक्का दिला आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत फ्रान्सच्या
कोर्नेटने कॅनडाच्या पाचव्या मानांकित आंद्रेस्क्यूला 6-2, 6-1 असे सरळ सेटमध्ये नामोहरम केले. या सामन्यात कोर्नेटनेमाजी अमेरिकन विजेत्या आंद्रेस्क्यूची सर्व्हिस पाच वेळा भेदत वर्चस्व गाजवले. दोन आठवड्यांपूर्वी कोर्नेटने बर्लिंन खुल्या टेनिस स्पर्धेत आंद्रेस्क्यूला पराभूत केले होते.
फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतील उपविजेत्या रशियाच्या अनास्तासिया पावल्युचेन्कोव्हाने रोमानियाच्या अ‍ॅन बोगडॅनचा 6-2, 6-2 अशा फरकाने पराभव करून दुसरी फेरी गाठली. फ्रेंच स्पर्धेत तिने प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती, परंतु बार्बोरा क्रेजिकोव्हाने तीन सेटमध्ये रंगलेल्या सामन्यात तिचा पराभव केला, तसेच तिसर्‍या मानांकित एलिना स्विटोलिनाने एलिसन व्हान युटव्हॅन्कचा 6-3, 2-6, 6-3 असा पराभव केला.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply