Wednesday , February 8 2023
Breaking News

सोनू सूदकडून नेमबाज कोनिकाला रायफल

रांची ः वृत्तसंस्था
अभिनेता सोनू सूद याने कोरोना संकटात अनेकांना मदत केली. लॉकडाऊनमध्ये हा बॉलीवूड अभिनेता खरा अर्थाने गरजूंसाठी देवदूत बनला. सूद फाऊंडेशनच्या माध्यमातून तो आजही गरजवंतांना मदत करीत आहे. नुकतेच सोनू सूदने झारखंडच्या नेमबाजाला महागडी रायफल घेऊन दिली. कोनिका लायक असे महिला नेमबाजाचे नाव आहे आणि तिने जानेवारी महिन्यात ट्विट करून सोनू सूदकडे मदत मागितली होती.
कोनिका ही झारखंडमधील धनबाद येथे राहणारी आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी दोन वेळा पात्र ठरलेल्या या नेमबाजाला प्रशिक्षक किंवा मित्र-मैत्रिणींकडून रायफल मागावी लागायची. तिने सोनू सूदकडे साकडे घातले होते. तिच्या ट्विटला सोनू सूदने मार्चमध्ये उत्तर दिले आणि लवकरच तिला रायफल मिळेल, असे आश्वासन दिले होते.
अखेर कोनिकाच्या घरी रायफल आली. तिने त्या रायफलसह फोटो पोस्ट करताना सोनू सूदचे आभार मानले. ’सर माझी बंदूक आली. माझ्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे आणि संपूर्ण गाव तुम्हाला आशीर्वाद देत आहे,’ असे तिने लिहिले. सोनूनेही तिच्या ट्विटला उत्तर दिले आणि म्हणाला, ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे सुवर्णपदक निश्चित. आता फक्त प्रार्थनेची गरज आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply