Monday , February 6 2023

कोकण विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ सेवानिवृत्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

विभागीय आयुक्त हे पद शेवटच्या माणसापर्यंत शासन योजना राबविण्याची सर्वात मोठी यंत्रणा आहे, असे मत विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले. बुधवारी (दि. 30) ते नियत वयोमानानुसार 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त या पदावर कार्यरत असतांना कोविड-19च्या प्रादूर्भावाच्या सुरुवातीच्या काळात नवी मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी अण्णासाहेब मिसाळ यांनी शासनाच्या विविध उपाय योजना प्रभावीपणे राबविल्या. नवी मुंबई ग्रीन सिटी करणेसाठी उद्याने विकसित करण्यासंबंधीचा मोठा प्रकल्प हाती घेतला. या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका देशामध्ये तिसर्‍या क्रमांकाची स्वच्छ महानगरपालिका म्हणून सन्मानित करण्यात आली. मिसाळ हे विभागीय आयुक्त कोकण विभाग या पदावर कार्यरत असतांना महाआवास अभियान-ग्रामीण योजनेत कोकण विभाग राज्यात अग्रेसर ठरला. कोरोना आपत्तीचा सामना करीत असतांना कोकण विभागात उद्भवलेल्या निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करून आपत्तीग्रस्तांना वेळेत मदत पुरविण्याबाबत मोलाचे प्रयत्न केले. कोकण विभागातील महसूलचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपले मनोगत व्यक्त करून मिसाळ यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर मिसाळ यांच्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभाचा छोटेखानी कार्यक्रम साध्या पध्दतीने पार पाडण्यात आला.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply