नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी (दि. 7) होणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना हावित यांच्या नावाची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळातील 17 ते 22 मंत्री 7 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या दुसर्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे. एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एकामागून एक बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला आहे. मोदी सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण केली आहे. सरकारी सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार पहिला विस्तार सर्वसमावेशक होण्याची शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील बर्याच जणांना संघटनांच्या जबाबदार्या दिल्या जाऊ शकतात. मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहर्यांचा समावेश असू शकतो. मंत्रिमंडळात प्रादेशिक पक्षांना समाविष्ट करण्याचीही तयारी सुरू आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …