Breaking News

पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार 18 हजार रुपये ठोक मानधन

पनवेल मनपा स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या बुधवारी (दि. 19) झालेल्या स्थायी समिती सभेत पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना 18 हजार रुपये ठोक मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे कोविड योद्धा बनून कार्यरत असणार्‍यांना 300 रुपये प्रतिदिन भत्ता देण्यास मान्यता दिली गेली. या वेळी कोरोना उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला.
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. या सभेत विविध विषय पटलावर होते. त्यापैकी महापालिकेत समावेश झालेल्या ग्रामपंचायतींमधील कर्मचार्‍यांचे मानधन कमी असल्याने त्यांना 18 हजार रुपये ठोक मानधन देण्याचा निर्णय सभापती प्रवीण पाटील यांनी घेतला. त्यास सर्वांनी पाठिंबा दर्शविला. त्याचबरोबर कोरोनाच्या संकटकाळात काही स्टाफ कोविड-19च्या ड्युटीवर असून, त्यांनी एप्रिल महिन्यापासून एकही सुटी घेतलेली नाही. अशा कोविड योद्ध्यांना प्रतिदिन 300 रुपये भत्ता देण्याची मागणी नगरसेविका संतोषी तुपे केली. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. याशिवाय अन्य लोकोपयोगी विषयांनाही या वेळी मान्यता दिली गेली.
पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना 18 हजार रुपये ठोक मानधन देण्यास स्थायी समितीच्या सभेत मंजुरी मिळाल्याने या कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply