Breaking News

अँडरसनने गाठला एक हजार बळींचा टप्पा

लंडन ः वृत्तसंस्था
इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने  काऊंटी चॅम्पियनशिप सामन्यात लँकशायरकडून खेळताना 19 धावा देऊन सात गडी बाद केले. यासह अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजार बळी पूर्ण केले. यापूर्वी 2005मध्ये अँडी कॅडिकने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजार बळींचा टप्पा गाठला होता. आता 16 वर्षांनंतर अँडरसनने केंटविरुद्ध खेळताना ही कामगिरी केली आहे.
अँडरसनने आतापर्यंत 262 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 51 वेळा पाच बळी घेण्याची किमया केली आहे. प्रथम श्रेणीत सर्वाधिक बळींचा विक्रम इंग्लंडचा माजी डावखुरा फिरकीपटू विल्फ्रेड रोड्सच्या नावावर आहे. त्याने 4,204 बळी घेतले आहेत. 38 वर्षीय अँडरसनने कसोटीत 617 बळी घेतले आहेत. त्याच्यापुढे भारताचा अनिल कुंबळे (619 बळी) आहे. त्यामुळे पुढच्या काही सामन्यात अँडरसन कुंबळेला मागे टाकू शकतो.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply