Breaking News

ब्राझीलची अंतिम फेरीत धडक

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा

रियो दी जानेरो ः वृत्तसंस्था
कोपा अमेरिका स्पर्धेत अनुभवी आणि बलाढ्य ब्राझीलने पेरूला 1-0 अशी मात देत अंतिम फेरीत धडक दिली. ब्राझीलला आता विजेतेपदासाठी अर्जेंटिना किंवा कोलंबिया यांच्याशी झुंजावे लागणार आहे.
ब्राझीलने सुरुवातीपासूनच पेरूवर वर्चस्व राखले. नेमारच्या नेतृत्वात ब्राझीलच्या स्ट्रायकर्सनी पेरूच्या गोलकीपरला सतत व्यस्त ठेवले. त्यांनी पेरूला श्वास घेण्यासही वेळ दिला नाही. ब्राझीलने एकामागून एक अनेक हल्ले केले, मात्र पेरूच्या गोलकीपरने सर्व हल्ल्यांचा सुंदर बचाव केला. उपांत्य सामन्यात ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार गोल करेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती, मात्र तो गोल करू शकला नाही, परंतु ब्राझीलने मारलेला एक गोल त्याच्या असिस्टमुळे आला.
सामन्याच्या उत्तरार्धात ब्राझीलने 1-0 अशी आघाडी घेतली. 34व्या मिनिटाला ब्राझीलने हा गोल केला. ब्राझिलियन सुपरस्टार खेळाडू नेमारकडून पास मिळाल्यानंतर 17व्या क्रमांकाची जर्सी परिधान केलेल्या लुकास पॅकिएस्टाने हा गोल केला. पहिल्या सत्रानंतर दुसर्‍या सत्राचा खेळ गोलरहित राहिला. पुढच्या 45 मिनिटांत कोणताही संघ गोल करू शकला नाही.
दुखापतीमुळे 2019च्या कोपा अमेरिका स्पर्धेत न खेळणारा नेमार या मोसमात आतापर्यंत पाच गोल करण्यात सहभागी झाला आहे. यामध्ये त्याने तीन गोलमध्ये असिस्ट, तर दोन गोल स्वत: केले आहेत.

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply