Breaking News

आरपीएलमधील चार खेळाडू महाराष्ट्र संघात

कर्जत ः बातमीदार
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने सुरू असलेल्या रायगड प्रीमियर लीग स्पर्धेत खेळत असलेल्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वेस्ट झोन स्पर्धेसाठी हे चार खेळाडू रायगडचे  प्रतिनिधित्व करतील.
उरण येथील जेएनपीटी क्रिकेट मैदान आणि रसायनी येथील एनआयएसएम क्रिकेट मैदानावर 25 वर्षाखालील टी-20 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत
वेगवेगळ्या संघांत खेळत असलेल्या चार खेळाडूंची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून वेस्ट झोन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. प्रतीक म्हात्रे, हृषिकेश राऊत, सिद्धार्थ म्हात्रे, रितेश तिवारी अशी या खेळाडूंची नावे आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित 25 वर्षांखालील खेळांडूसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्र संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयोजित सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने याबाबत माहिती दिली.
रायगड जिल्ह्यातून निवड झालेल्या चार खेळाडूंचे आरपीएल समितीचे अध्यक्ष राजेश पाटील, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदिप नाईक, आरपीएलचे सचिव जयंत नाईक, उपाध्यक्ष आनंद घरत, डॉ. राजाराम हुलवान, खजिनदार कौस्तुभ जोशी, अ‍ॅड. पंकज पंडित, शंकर दळवी, संदीप जोशी यांच्यासह असोसिएशन व लीगच्या सदस्यांनी अभिनंदन केले. 

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply