Monday , February 6 2023

जोकोव्हिच वि. बेरेटिनी रविवारी फायनल

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा

लंडन ः वृत्तसंस्था
सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचने विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. उपांत्य फेरीत जोकोव्हिचने शापोवालोव्हचा 7(7)-6(3), 7-5, 7-5 असा पराभव केला. जोकोव्हिच सातव्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. आता रविवारी (दि. 11) होणार्‍या अंतिम फेरीत जोकोव्हिचची लढत इटलीच्या मटेओ बेरेटिनीशी असणार आहे.
सातव्या मानांकित मटेओ बेरेटिनीने उपांत्य फेरीत हुबार्ट हुर्काझ याचा 6-3, 6-0, 6-7, 6-4ने पराभव करीत पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा तो इटलीचा पहिला टेनिसपटू आहे. याशिवाय बेरेटिनीने पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे.
हुर्काझने उपांत्यपूर्व सामन्यात 14व्या मानांकित हुर्काझने फेडररवर अवघ्या एक तास आणि 49 मिनिटांत 6-3, 7-6 (7-4), 6-0 असे सरळ तीन सेटमध्ये वर्चस्व गाजवले. या पराभवामुळे फेडररचे 21व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न भंगले होते, मात्र उपांत्य फेरीत त्याला बेरेटिनीकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply