लंडन ः वृत्तसंस्था
युरो चषक उंचाविण्यासाठी अंतिम सामन्यात इंग्लंड वि. इटली संघ भिडणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार रविवारी (दि. 11) मध्यरात्री 12.30 वाजता सुरू होईल. तत्पूर्वी सकाळी 5.30 वा. ब्राझील वि. अर्जेंटिना या कोपा अमेरिका स्पर्धेतील अंतिम सामन्याचा निकाल लागलेला असेल.
युरो कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कला नमवत इंग्लंडने अंतिम फेरीत धडक दिली आहे, मात्र या विजयाला वादाची झळ बसली. हॅरी केनने निर्णायक गोल झळकावत इंग्लंडला विजय मिळवून दिला, मात्र हा झळकावण्यापूर्वी डेन्मार्कच्या गोलकिपरवर लेझर लाइट मारल्याचा प्रकार घडला होता.
दुसरीकडे थरारक उपांत्य लढतीत इटलीने स्पेनला नेस्तनाबूत करीत नऊ वर्षांनी पुन्हा अंतिम फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यामुळे इटली आणि इंग्लंडमध्ये अंतिम सामना रंगणार आहे.
Check Also
अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….
काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …
RamPrahar – The Panvel Daily Paper