पनवेल ः भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा तथा पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मुग्धा लोंढे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक नितीन पाटील, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, अभिषेक पटवर्धन, युवा नेते पवन सोनी, महेंद्र गोडबोले, संदीप लोंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुग्धा लोंढे यांना विविध स्तरांतून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.