Monday , January 30 2023
Breaking News

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा गौरवशाली जीवनपट वेबेक्सवर

खारघर ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनसंघाचे संस्थापक तसेच भाजप कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतीदिन 23 जून आणि जन्मदिन 6 जुलै या पंधरवड्यात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळ स्तरावर अनेक कार्यक्रम झाले. खारघर तळोजा मंडल अंतर्गत प्रज्ञा प्रकोष्ठने 6 जुलै या श्रध्येय श्यामाप्रसादजींच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या विविधांगी संघर्षमय जीवनाचा गौरवशाली जीवनपट वेबेक्सवरील व्याख्यानात मांडला. प्रज्ञा प्रकोष्ठचे संयोजक डॉ. राकेश सोमानी व सहसंयोजिका अपर्णा काबरा यांनी उपस्थित श्रोत्यांना अभ्यासपूर्ण व शैलीदार व्याख्यानाने खिळवून ठेवले. प्रकोष्ठचे सहसंयोजक संदीप एकबोटे यांनी सूत्रसंचालन तसेच सदस्य मनोज सिन्हा यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या वेळी विशेष आमंत्रित या नात्याने उत्तर रायगड जिल्हा सरचिटणिस व खारघर तळोजा मंडलचे प्रभारी दीपक बेहरे, खारघर तळोजा मंडलातील मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेविका आरती नवघरे, अनिता पाटील, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, उपाध्यक्ष संजय घरत, रमेश खडकर, उत्तर रायगड जिल्हा सोशल मीडिया सेल सहसंयोजिका मोना अडवानी, महिला मोर्चाच्या सरचिटणीस साधना पवार, चिटणीस स्मिता आचार्य, अश्विनी भुवड, सोशल मीडिया खारघरचे संयोजक अजय माळी, वॉर्ड 4चे अध्यक्ष वासुदेव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व खारघर शहरातील रहिवासी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खारघर तळोजा मंडलचे उपाध्यक्ष दिलीप जाधव व सरचिटणीस दीपक  शिंदे यांनी विशेष सहकार्य केले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply