Breaking News

गोव्यात ऑक्सिजनअभावी 13 रुग्णांचा मृत्यू

पणजी ः वृत्तसंस्था
गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन पातळी घसरल्याने शुक्रवारी (दि. 14) मध्यरात्री 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही घटना घडली.
गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. मंगळवारी 26, बुधवारी 20, गुरुवारी 15 आणि शुक्रवारी 13 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने मेडिकल कॉलेजमधील ऑक्सिजन पुरवठ्याच्या प्रश्नावर समितीची नियुक्ती केली असून, ही समिती तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे.
दरम्यान, गोव्यातील ऑक्सिजन कमतरता ही महाराष्ट्रातून कमी पुरवठ्यामुळे होत असल्याची तक्रार गोवा सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गोव्याने केंद्राला सांगितले की, दरदिवशी महाराष्ट्रातील कोल्हापुरातून त्यांच्या वाट्याचा 11 टन ऑक्सिजन मिळत नाही. राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार यांनी डीपीआयआयटी विभागातील अतिरिक्त सचिवांना पत्रातून ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, गोव्याला गेल्या 10 दिवसांत त्यांच्या वाट्याचा जवळपास 40 टन ऑक्सिजन मिळालेला नाही.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply