म्हसळा ़: प्रतिनिधी
भाजप कोकण विकास आघाडीच्या सहकार्याने आणि श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ भाजप अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या प्रयत्नाने श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील गरीब व गरजूंना बुधवारी (दि. 14) अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव आणि रोजगाराच्या संधी नसल्यामुळेे अनेक गरीब कुटुंबे सध्या त्रस्त आहेत, हे लक्षात घेऊन श्रीवर्धन तालुक्यातील दिघी आणि म्हसळा तालुक्यातील चाफेवाडी, रेवळी, घाणेरीकोड, चिरगाव, पेडांबे, आगरवाडा, गोंडघर, वारळ, देहेन, पाष्टी, खामगाव, चिखलप, खारगाव खुर्द, रोहिणी या गावामधील गरीब व गरजूंना बुधवारी भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या नेतृत्वाखाली जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. ही मदत भाजप कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडीवारेकर व राजेंद्र कुडतरकर यांच्या माध्यमातून पाठवण्यात आली होती. भाजप तालुका उपाध्यक्ष अनिल टिंगरे, समीर धनसे, तालुका चिटणीस मनोहर जाधव, प्रशांत महाडिक, योगेश महागावकर, परशुराम मुकणे आदी पदाधिकार्यांसह कार्यकर्ते व ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.