Breaking News

वारकरी संप्रदायाकडून राज्य सरकारचा निषेध

खालापूरमध्ये तहसीलदारांना निवेदन

खालापूर ः प्रतिनिधी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरची पायी वारी दिंडी रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा विश्व हिंदू परिषद आणि समस्त वारकरी संप्रदायाकडून निषेध करण्यात आला. वारकर्‍यांनी भजन करीत रस्त्याने वारीमधून जात आंदोलन केले आणि तहसीलदारांना निवेदन सादर केले.

पायी वारीला विरोध, वारकर्‍यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या पताकांचा अपमान आणि ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजरकैदेचा निषेध म्हणून विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदाय खालापूर प्रखंडने तहसीलदार इरेश चप्पलवार यांना निवेदन देत आपल्या भावना राज्य सरकारकडे पोहचवण्याची मागणी केली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी प्रमाणात जाणवत असल्याने सर्व नियम पाळून वारकर्‍यांनी पायी वारी काढण्याचा निर्णय घेतला, मात्र हिंदू धर्मविरोधी राज्य सरकारने या वर्षी पायीवारीवर बंदी घातली. एवढेच नव्हे तर ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अटक केली असून वारकर्‍यांची जागोजागी अडवणूक केल्याने वारकरी संप्रदायामध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

संविधानाने नागरिकांना दिलेला उपासना करण्याचा अधिकार व मूलभूत स्वातंत्र्य यांना कोणी अडवू शकत नाही. म्हणूनच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व वारकारी संप्रदाय यांच्या वतीने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत असताना खालापूरातही विश्व हिंदू परिषद व वारकरी संप्रदाय खालापूर प्रखंडने तहसीलदार इरेश चप्पलवार यांना निवेदन राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला आणि आमच्या या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचव्यात अशी मागणी वारकरी मंडळींना तहसीलदारांना केली.

या वेळी ह.भ.प. कृष्णा लांबे महाराज, ह.भ.प. महादेव महाराज मांडे, ह.भ.प. दिगंबर महाराज सणस, ह.भ.प. मधुकर महाराज कालेकर, ह.भ.प. गोपीनाथ महाराज पाटील, देहू मोतिराम पवार, यशवंत खोपडे, गणपत पाटील, विनायक गायकर, एकनाथ पवार, विश्व हिंदू परिषदेचे रमेश मोगरे, संजय देशमुख, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply