Breaking News

पांढरवेढा ः एका जंगलातील रहस्यमयी गोष्ट

श्रीवर्धनमधील तरुणांनी साकारला लघुचित्रपट

श्रीवर्धन : प्रतिनिधी

निसर्गाचे वरदान लाभलेल्या घनदाट जंगलात दडलेली नैसगिर्क संपत्ती लाटण्यासाठी मानव कोणत्याही थराला जातो. त्यासाठी दुर्मीळ जनावर, दुर्मीळ वनस्पती आदींची कत्तल केली जाते. इतकाच नाही तर लालसेपोटी यासाठी मानव मानवाचादेखील बळी घेण्यास कमी करत नाही. त्याचप्रमाणे एका घनदाट जंगलातील विहिरीतून सोन्याची नाणी काढण्यासाठी गावातील नागरिकांना जंगलात अडकवणार्‍या एका व्यक्तीचा काल्पनिक लघुचित्रपट श्रीवर्धनमधील तरुणांनी साकारला आहे.

पांढरवेडा हे एक घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले गाव आहे. घनदाट जंगलातील रहस्यमयी अशी काल्पनिक गोष्टीवर आधारित एक लघुकथा आहे. या कथेत नंदन नावाच्या मुलाची प्रमुख भूमिका कथेचे लेखक दर्पण जाधव याने केली आहे. दिग्दर्शन अजिंक्य भोसले, छायाचित्रकार अभिषेक पोतनीस, धनंजय म्हात्रे, पद्मनाभ खोपकर, धनंजय म्हात्रे यांनी केले आहे तर राजन काका यांच्या भूमिकेत विशाल नागवेकर, यश गौरव करंजकर, हरि काकाच्या भूमिकेत किशोर शिताले ही श्रीवर्धनमधील तरुण कलाकार पहावयास मिळत आहेत.

या कथेत नंदन नावाचा एक मुलगा पंधरा वर्षांनी आपल्या पांढरवेढा गावात येतो. गावात आल्यावर त्याला गावात घडणारे चित्र  विचित्र प्रकार निदर्शनास येतात. गावातून अचानक माणसे गायब होतात. गायब झालेल्या माणसांना पांढरवेढा जंगल गिळतो. जंगला पासून रक्षण होण्यासाठी गावातील नागरिक जंगलाला प्राण्याचा बळी देतात. गावातील नागरिकांना अंधश्रद्धा आणि गैरसमज झालेला असतो. हे सर्व प्रकार बघून नंदन अस्वस्त होऊन गावातील माणसे गायब होण्यामागचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. भीतीने जंगलाकडे घाबरून कोणीही फिरकत नसताना नंदन सर्व प्रकाराची शहानिशा करण्यासाठी पांढरवेढ्याच्या जंगलात जातो. जंगलात त्याला काही रहस्यमयी गोष्टी दिसतात. जंगलात एक सोन्याचे शिक्के मिळणारी विहीर असते, मात्र विहिरीतून मूठभर शिक्के काढणासाठी एक राखणदार म्हणून माणूस आणला तरच विहिरीतून मूठभर सोन्याची नाणी काढता येतात. त्यासाठी गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती गावातील एक एक व्यक्तीला या विहिरीचा राखणदार म्हणून अडकवत असून आपले ध्येय साध्य करून घेत असत.

जंगतील या भागास दुसरी बाजू दुसरी बाजू म्हणून ओळखली जाते. आश्या काल्पनिक रहस्यमयी घटनांचा उलगडा या लघुचित्रपटात मांडला आहे. सध्या हा लघुचित्रपट आम्ही आहोत स्टगलर या युट्युब चॅनल वर दिसत असून लघुचित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply