Breaking News

मंत्री आव्हाडांकडून नियम मोडून मंदिरात आरती

गुन्हा मात्र फक्त कार्यकर्त्यांवर

नाशिक ः प्रतिनिधी
राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे रविवारी खासगी दौर्‍यानिमित्त नाशिकमध्ये आले होते. या वेळी त्यांनी आनंदवली येथील नवश्या गणपती मंदिरात हजेरी लावून आरती केली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये मंत्री आव्हाड यांना वगळून मंदिरात उपस्थित असणार्‍या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. असे असताना राज्याच्या मंत्र्यांनीच निर्बंधांचे उल्लंघन करीत चक्क मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन आरती केली. भाविकांकडून या प्रकरणी प्रश्न उपस्थित केल्यानंतर पोलीस यंत्रणा जागी झाली झाली आणि नियम मोडल्याप्रकरणी पाच कार्यकर्त्यांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र पोलिसांनी मंत्र्याना अभय देत केवळ कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मंत्र्यांसाठी वेगळा आणि सामान्य जनतेसाठी वेगळा कायदा आहे का, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply