Breaking News

टोकियो ऑलिम्पिक उद्घाटनाचा मर्यादित पण नेत्रदीपक सोहळा; मेरी कोम आणि मनप्रीतने केले भारतीय पथकाचे नेतृत्व

टोकियो ः वृत्तसंस्था

कोरोनाच्या सावटामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शुक्रवारी (दि. 23) जपानच्या नॅशनल स्टेडियमवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन झाले. सोहळ्यादरम्यान सादर करण्यात आलेले नयनरम्य देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्तबद्ध संचलन या बाबींनी जगभरातील चाहत्यांची मने जिंकली. सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर फक्त अतिमहत्त्वाच्या अतिथींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा झाला. जपानचे सम्राट नरुहिटो, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची पत्नी जिल बायडेन यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली. या सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी नॅशनल स्टेडियमबाहेर हजारो चाहत्यांनी गर्दी केली, परंतु प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली. उद्घाटन सोहळ्याला बरोबर 20 सेकंद फटाक्यांची आतषबाजी करून प्रारंभ करण्यात आला. त्याशिवाय कोरोनामुळे प्राण गमावणार्‍या जगभरातील नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली. जपानी वर्णमालेप्रमाणे सर्व संघांच्या संचलनास सुरुवात झाली. भारताने 127 खेळाडूंसह 228 सदस्यीय पथक टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यात आले आहे.आतापर्यंतचे भारताचे हे सर्वांत मोठे पथक आहे. उद्घाटन सोहळ्याच्या मार्चपास्टमध्ये भारतीय तुकडी 21व्या क्रमांकावर उतरली. यात 22 खेळाडू आणि सहा अधिकारी सहभागी झाले. उद्घाटन सोहळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी टीव्हीवरून पाहत होते. भारतीय पथकाच्या प्रवेशावेळी पंतप्रधान मोदींनी टाळ्या वाजवून संघाला प्रोत्साहन दिले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply