Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेलच्या ग्रामीण भागात विकासकामांचा शुभारंभ

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 49 लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून ग्रामीण भागात करण्यात येणार्‍या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 12) झाले. ही कामे मार्गी लावल्याबद्दल या वेळी ग्रामस्थांनी आभार मानले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 25-15 या स्थानिक ग्रामविकास निधीतून 10 लाख रुपये खर्चून वावंजे ग्रामपंचायतीमधील कुंभारपाड्यातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, वावंजे ते पालेखुर्द रस्त्याचे 20 लाख रुपयांमधून रस्ता काँक्रीटीकरण, खानाव ग्रामपंचायतीमधील महालुंगी आदिवासीवाडीतील अंतर्गत रस्त्याचे नऊ लाख रुपये खर्चून काँक्रीटीकरण, तर खैरवाडीतील कोंडले येथे 10 लाख रुपये खर्चून विसर्जन घाट बांधण्यात येणार आहे. या विकासकामांचे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी आणि महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष कमला देशेकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
या कार्यक्रमांना वावंजे येथे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष प्रकाश खैरे, अल्पसंख्याक मोर्चा उत्तर रायगड चिटणीस नासिर शेख, युवा मोर्चा पनवेल ग्रामीण मंडल चिटणीस सचिन पाटील, वावंजे पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष निलेश दाढावकर, युवा नेता दशरथ म्हात्रे, सागर भोईर, महेश राघो पाटील, उल्हास पाटील, हरेश पाटील, पांडुरंगबुवा पाटील, वासुदेव चोरमेकर, अरुण चोरमेकर, ज्ञानेश्वर पाटील, विष्णूबुवा दाढावकर, लहुबुवा दाढावकर, भगवान दाढावकर, पांडुरंग दाढावकर, जगन धोंगडे, यशवंत धोंगडे, सुरेश धोंगडे, लक्ष्मण दाढावकर, बाळाराम दाढावकर, राघो दाढावकर, बबन दाढावकर, जगन दाढावकर, शनिवार दाढावकर, संतोष दाढावकर, धनंजय दाढावकर, भूषण दाढावकर, रोहित दाढावकर, धीरज दाढावकर, गुलशन पाटील, विनोद गोंधळी, प्रथमेश म्हात्रे, मयूर खैरे, संतोष गायकर, अब्दुल मजीद शेख, इरफान शेख, अन्वर शेख, कॅयूम शेख, अली खान, तोसिफ शेख, अली खान, सोहेल शेख, अमित इटकर, बाबू इटकर, नदीम शेख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित, ग्रामस्थ होते. या वेळी प्रकाश खैरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. या ठिकाणी अशोक साळुंके व ज्ञानेश्वर घोगरे हेही उपस्थित होते.
यानंतर महालुंगी येथे झालेल्या कार्यक्रमास सरपंच निलम अरिवले, बूथ अध्यक्ष मनोहर अरिवले, ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र गोंधळी, ज्येष्ठ नागरिक लहूशेठ खाने, युवा कार्यकर्ता उमेश बडेकर, राजेंद्र पाटील यांच्यासह बबन नाईक, दिलीप वाघे, संतोष वाघे, योगेश गोंधळी, शांताराम पवार, लहू वाघे, परशा वाघे, विजय नाईक, गोट्या पवार, शत्रुघ्न गोंधळी, यशवंत वाघे, काळूराम वाघे, मच्छींद्र वाघे, मंगल वाघे, सुंदरा वाघे, माजी सरपंच सोपान वाघे, विलास गोंधळी, नवनाथ पवार; तर कोंडले येथील कार्यक्रमास तळोजाचे माजी सरपंच संतोष पाटील, तुकाराम पाटील, बाळाराम पाटील, पांडुरंग पाटील, बुधाजी खैरे, जनार्दन कोळंबेकर, रामदास शिंदे, रामदास कातकरी, गजानन कोळंबेकर, बाळाराम उसाटकर, दिनेश फडके, पिंटू म्हात्रे, रमेश नावडेकर, रामदास म्हात्रे, श्रीराम बडेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, भाजप युवा मोर्चाच्या पनवेल ग्रामीण मंडळ अंतर्गत नियुक्ता जाहीर झाल्या असून यात तालुका चिटणीसपदी सचिन पाटील, तर वावंजे पंचायत समिती अध्यक्षपदी निलेश दाढावकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्याबद्दल भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी या वेळी सचिन पाटील आणि निलेश दाढावकरचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply