नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आगामी सणांमध्ये मेड इन इंडिया अंतर्गत बनवलेल्या वस्तूंचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, एकेकाळी परदेशी वस्तूंची खूप क्रेझ होती, पण आज मेड इन इंडियाची शक्ती खूप वाढली आहे. आपण प्रत्येक लहान वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरला पाहिजे, जी मेड इन इंडिया आहे. हे प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळेच शक्य होईल. पंतप्रधानांनी देशवासीयांना आवाहन केले की, भारतीयांनी बनवलेल्या वस्तू विकत घ्या. स्वच्छ भारत अभियान ही एक जनचळवळ आहे, त्याचप्रमाणे भारतीयांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करणे चळवळ बनवा. अगदी लहान वस्तू खरेदी करण्यावरही भर दिला पाहिजे, जी भारतात बनली आहे आणि जी बनवण्यासाठी भारतीयांनी घाम गाळला आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …