Breaking News

राज म्हणाला शिल्पासोबत माझे संबंध ठीक नाही -शर्लिन चोप्रा

मुंबई : प्रतिनिधी

पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली अटक असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राबाबत अभिनेत्री शर्लिन चोप्राने धक्कादायक खुलासा केला आहे. राज कुंद्रा मला किस करत म्हणाला की शिल्पासोबत माझे संबंध ठीक नाहीत, असा दावा शर्लिनने तिचा जबाब नोंदविताना केला .

शर्लिनला मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्रा प्रकरणी तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. 2019 च्या सुरुवातीच्या काळात राज कुंद्राने शर्लिनत्या बिझनेस मॅनेजरशी संपर्क साधला होता. 27 मार्च रोजी यानिमित्ताने मीटिंग झाल्यानंतर, एका टेक्स्ट मेसेज वरून झालेल्या वादावरून राज अचानक शर्लिनच्या घरी आला होता, असे शर्लिनने त्या जबाबात म्हटले आहे.

पुढे शर्लिन म्हणाली, शर्लिनने नकार दिला तरी राज तिला सारखा किस करत होतात. शर्लिनने राजला सांगितले की तिला कोणत्याही विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवायचे नव्हते. तर राजने यावर तिला उत्तर दिले की त्याची पत्नी शिल्पा शेट्टी आणि त्याचे नाते हे काही ठीक नाही आणि यावरून तो घरी बर्‍याच वेळा तणावात असायचा.

पुढे शर्लिन म्हणाली की, तिला भीती वाटू लागली होती म्हणून तिने राजला थांबवण्याचा प्रयत्न केला. थोड्यावेळाने शर्लिनने राजला धक्का दिला आणि ती पटकन बाथरूममध्ये गेली.

राज कुंद्राच्या अटकेनंतर मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर पत्नी शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान शिल्पा राजवर संतापली आणि रडत म्हणाली, ‘तू आपल्या कुटुंबाच नाव खराब केले.’ आता या सगळ्यात शिल्पा देखील असू शकते अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply