कर्जत : बातमीदार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्जत तालुक्यातील स्वयंसेवकांनी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पुर बाधित गावात जावून विविध प्रकारची मदत करण्याचे काम हाती घेतले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्जत शाखेचे स्वयंसेवक दोन गटात महाड आणि पोलादपूर तालुक्यात पोहचले आहेत. त्यातील काही कार्यकर्ते पुरग्रस्त गावात जाऊन तेथे कोणत्या वस्तूंची गरज आहे, याची माहिती घेतात आणि त्यानंतर त्या गावात जाऊन संजीव दातार, विशाल जोशी, महेश निघोजकर, प्रतीक पाटील, सोमनाथ म्हामणे यांच्यासह अनेक स्वयंसेवक पूरग्रस्तांना मदत वाटप करण्याचे काम करीत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्जत तालुक्यातील स्वयंसेवकांनी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी गव्हाचे पीठ 125 किलो, पाणी बॉक्स 300, पारले बिस्कीट 888 पॅकेट, टॉवेल 500 नग, तांदूळ 215 किलो, साखर 30 किलो, चहा पावडर पाच किलो, गहू 26 किलो, तूरडाळ 25 किलो, मसूरडाळ तीन किलो, राजगिरा लाडू 100 पॅकेट, मीठ 100 किलो, हळद आठ किलो, तिखट आठ किलो, सॅनिटायझर व हँड वॉश एक बॉक्स, फिनेल 11 लिटर, स्नॅक्स पाच किलो, मेणबत्ती दोन बॉक्स, माचीस तीन बॉक्स, टूथपेस्ट चार डझन, टूथब्रश 10 डझन, शांपू 100 पॅकेट, कपड्याचा साबण 120 नग, अंगाचा साबण 96 नग, खोबरेल तेल 96 बॉटल, पॅराशिटॅमॉल एक डबा, गॅस शेगडी एक नग, मोठ्या डिश नऊ नग, हांडे चार नग, सॅनिटरी पॅड चार बॉक्स, बटाटी 10 किलो, कांदे पाच किलो, वायपर व पोचा प्रत्येकी एक पॉलिथीन बॅग 10 किलो या वस्तूंच्या मदतीचे वाटप केले.