Breaking News

लवलिनाचा पदकासाठी विजयी ठोसा

टोकियो : वृत्तसंस्था

टोकियो ऑलिम्पिकमधील सातवा दिवस भारतासाठी आनंदी ठरला. बॉक्सिंगमध्ये 69 किलो वजनी गटात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लवलिना बोरगोहेनने तैपईच्या निएन चिन चेनचा पराभव करत देशाचे दुसरे पदक निश्चित केले. लवलिना बोरगोहेनने निएन चिन चेनवर 4-1 असा विजय मिळवला. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे. याआधी 2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदर सिंगने कांस्य, 2012मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोमने कांस्य पदक जिंकले होते आणि आता लवलिनाने पदक निश्चित केले आहे. आता या पदकाचा रंग कोणता असेल याची सर्वांना उत्सुकता आहे. लवलिनाने सुरुवातीच्या काळात फार संघर्ष केलाय. तिचे वडील टिकेन यांचे छोटे दुकान होते. लवलिनाकडे ट्रकसूटसाठी देखील पैसे नव्हते. डायटसाठी देखील तिला संघर्ष करावा लागला होता. लवलिनाने 2018 आणि 2019 साली वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले होते, तर पहिल्या इंडियन ओपन इंटरनॅशनल बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य आणि दुसर्‍या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. 2017 साली तिने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळवले होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply