Breaking News

विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी 9 ऑगस्टला मशाल मोर्चा; सर्वपक्षीय कृती समितीची आढावा बैठक

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 1) आढावा बैठक झाली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने पहिल्यांदा 10 जून रोजी भव्य साखळी आंदोलन केले होते, तर 24 जून रोजी सिडको घेराव भव्य आंदोलन करण्यात आले. विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्यावे यासाठी भूमिपुत्रांच्या भावना तीव्र असतानाही राज्य सरकार याची दखल घेत नसल्याने कृती समितीने ऑगस्ट क्रांती दिनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे. या संदर्भात रूपरेषा, नियोजन आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस आमदार महेश बालदी, दशरथ भगत. जे. डी. तांडेल, राजेश गायकर, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply