दुबई : वृत्तसंस्था
टीम इंडियाची युवा धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा हिने जागतिक टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिला टी-20 क्रिकेटपटूंची ताजी यादी जाहीर केली. यात शफाली तब्बल 19 स्थानांची झेप घेत पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. शफालीने न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू सुझी बेट्स हिला मागे टाकले. सुझीची एका स्थानाने घसरण होऊन ती दुसर्या स्थानी गेली आहे. सुझीचे 750 गुणांक आहेत, तर शफाली 761 गुणांकासह अव्वल आहे. ऑक्टोबर 2018पासून सुझी अव्वल स्थानी होती. अखेर 17 महिन्यांनी तिला दुसर्या स्थानी ढकलत शफालीने अव्वल स्थान पटकावले.सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत शफालीने शानदार कामगिरी केली आहे. यापूर्वी भारताचीच मिताली या क्रमवारीत राज अव्वल राहिलेली आहे.