Breaking News

ऑनलाइन बुद्धीबळ स्पर्धेत रशियाचा वाखलामोव्ह विजेता

मुंबई ः प्रतिनिधी

दै. शिवनेरतर्फे माजी गृहराज्यमंत्री तथा भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या वाढदिवसानिमित आयोजित ऑनलाइन विनाशुल्क बुद्धीबळ स्पर्धेत साखळी 11 फेर्‍यांमध्ये 10 गुण जिंकून रशियाचा फिडे मास्टर इगोर वाखलामोव्ह विजेता ठरला. वाखलामोव्हने उत्तम सरासरीच्या बळावर दिल्लीचा फिडे मास्टर आर्यन वार्ष्णेयला (10 गुण) द्वितीय स्थानावर टाकले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, इन्स्टिट्यूट फॉर चेस एक्सलंट व मुंबई शहर जिल्हा बुद्धीबळ संघटना सहकार्यीत स्पर्धेमध्ये भारतासह रशिया, जॉर्जिया, इराण, तुर्की, नेपाळ, बांगलादेश, व्हिएतनाम, अमेरिका आदी देशातील नामवंत 477 खेळाडूंनी रंगत आणली. साखळी नवव्या फेरीपर्यंत आघाडीवर राहिलेला चेन्नईचा इंटरनॅशनल मास्टर हरिकृष्णनला (9.5 गुण) मात्र तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. आसामच्या मयंक चक्रबोर्तीने (9 गुण) चौथा, इराणच्या पौर अघाने (9 गुण) पाचवा, चेन्नईचा ग्रँड मास्टर आर. आर. लक्ष्मणने  (9 गुण) सहावा, नवी मुंबईच्या आकाश दळवीने  (9 गुण) सातवा, पॉन्डिचेरीच्या पिटर आनंदने (9 गुण) आठवा, मुंबईच्या वेदांत पानेसरने (8.5 गुण) नववा तर तुर्कीच्या सुलेयमान सल्तिकने (8.5 गुण) दहाव्या क्रमांकाचा रोख पुरस्कार मिळविला. नरेंद्र वाबळे, लीलाधर चव्हाण व राजाबाबू गजंगी यांनी शुभेच्छा देत सुरू झालेल्या स्पर्धेमध्ये विजेत्या-उपविजेत्यांना एकूण 33 पुरस्कार देण्यात आले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply