Breaking News

‘रोटरी’तर्फे पत्रकारांना मास्क, सॅनिटायझर

पनवेल : वार्ताहर – रोटरी क्लब ऑफ कळंबोलीच्या वतीने पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या पत्रकारांना मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

या वेळी पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, ज्येष्ठ सल्लागार सुनिल पोतदार यांच्यासह इतर पदांधिकारी व सदस्य पत्रकारांच्या उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ कळंबोलीचे अध्यक्ष भरत शिंदे, नाना कांडपिळे, रावसाहेब जाधव, अक्षय कांडपिळे, अ‍ॅड. मितेश पाटील आदींनी मास्कसह सॅनिटायझरचे वाटप केले. धकाधकीच्या जीवनात पत्रकार प्रत्येक घटना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जागरूक असतात. त्यांच्या काळजीपोटी उपक्रम राबवित असल्याचे अध्यक्ष भरत शिंदे यांनी सांगितले.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply