Breaking News

‘इ स्टोर इंडिया’ची पूरग्रस्तांना मदत

पनवेल : प्रतिनिधी

इ स्टोर इंडिया या सुपर बाजारच्या पनवेलच्या मालक व कार्यकर्त्या रेणुका पन्हाळे यांनी महाड येथील पूरग्रस्त बांधवाना  मदतीचा हात दिला आहे.

पनवेल शहरातील टपालनाका येथील मोमीनपाडामधील साई सारंग कॉ ऑप. हौ. सोसायटी या ठिकाणी सर्वांना सवलतीच्या दरात जीवनावश्यक साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता वेदिक आयुरकेअर कंपनीने इ-स्टोर इंडिया या सुपरबझारची सुरुवात केली आहे. इ-स्टोरच्या माध्यमातून बेरोजगार, गृहिणी, सेवानिवृत्त, विध्यार्थी, यांना व्यवसायाची संधी रेणुका पन्हाळे यांनी उपलब्ध करून दिली आहे.

महाड येथे 22 जुलै रोजी आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले. त्या पूरग्रस्त बांधवाना रेणुका पन्हाळे यांनी मदतीचा हात दिला आहे. महाड पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची 50 किट त्यांनी पाठवली आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply